बीड

बीड जिल्ह्यात 21 कोरोना बाधित:राज्यात 5455 तर देशात 50407 कोरोना बाधित

बीड जिल्ह्यात आज दि 12 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 906 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 21 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 885 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात आष्टी 2 बीड 3 धारूर 1 गेवराई 1 केज 3 माजलगाव 1 परळी 7 वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात ५ हजार ४५५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येतील घट कायम आहे. राज्यात आज ६ हजारांपेक्षा कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ४५५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ६३ जणांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८ लाख ३५ हजार ८८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४३ हजार ३५५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ६० हजार ९०२ सक्रीय रुग्ण आहेत.

आज दिवसभरात १४ हजार ६३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ७६ लाख २६ हजार ८६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३४ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे.

राज्यातील ओमिक्रॉनची परिस्थिती

राज्यात आज ७६ जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. आज पुणे मनपामध्ये ४६, अमरावतीमध्ये १२, जालनामध्ये ८, पुणे ग्रामीणमध्ये ४, वर्ध्यात ३, सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि इतर जिल्ह्यात १ प्रत्येकी ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ३ हजार ५३१ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत.

देशात ५० हजार ४०७ नवे रुग्ण

देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत हळूहळू घट नोंदवण्यात येत आहे. पण मृतांचा वाढता आकडा कायम आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५० हजार ४०७ नवे रुग्ण आढळून आले.

तर ८०४ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १ लाख ३६ हजार ९६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात ६ लाख १० हजार ४४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. पॉझिटिव्हिटी रेट ३.४८ टक्क्यांवर आला आहे. देशात आतापर्यंत एकूण ५ लाख ७ हजार ९८१ जणांचा बळी घेतला आहे.

याआधीच्या दिवशी देशात ५८ हजार ७७ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ६५७ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, १ लाख ५० हजार ४०७ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९७.१७ टक्क्यांवर पोहचला होता. तर, दैनंदिन कोरोना संसर्गदर ३.८९ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर ५.७६ टक्के नोंदवण्यात आला. तीन दिवसांनी दैनंदिन कोरोना मृत्यूसंख्या १ हजारांहून खाली आहे. यापूर्वी ६ फेब्रुवारीला ८९५ कोरोनामृत्यूची नोंद घेण्यात आली होती.

महाराष्ट्र लवकरच होणार अनलॉक

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत १५ टक्क्यांनी घट झाली आहे. पण नवीन ६३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट होत असताना महाराष्ट्रात संपूर्ण अनलॉक जाहीर करण्याची तयारी चाललेली आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत शुक्रवारी दिले. तथापि, केंद्र सरकार आणि कोव्हिड टास्क फोर्सच्या सल्ल्यानंतरच यासंदर्भातील निर्णय जाहीर केला जाईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले, नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही राज्य ‘अनलॉक’च नव्हे तर ‘मास्क फ्री’ही करण्याबाबतची चर्चा दोन्ही अंगांनी केलेली आहे. महाराष्ट्रात लवकरच संपूर्ण अनलॉक जाहीर करण्यासाठी केंद्र आणि राज्य कोव्हिड टास्क फोर्सकडून सल्लाही मागितला गेला आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *