बीड जिल्ह्यात 29 कोरोना बाधित:राज्यात 7142 तर देशात 67084 बाधित
बीड जिल्ह्यात आज दि 10 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1252 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 29 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1223 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 2 बीड 1 धारूर 1 गेवराई 2 केज 8 माजलगाव 1 परळी 8 शिरूर 1 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात 7 हजार 142 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
मुंबई – राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात (Corona Cases Control) येत असताना आज किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील दोन दिवस सहा हजार रुग्ण आढळून आले होते. मात्र, आज (9 फेब्रुवारी) 7 हजार 142 नव्या रुग्णांची नोंद (New Corona Cases in Maharashtra) झाली आहे. तर, 92 जणांचा मृत्यू झाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वीस हजाराच्या आसपास असून, सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटली आहे.
राज्यात 82 हजार 893 कोरोना सक्रिय रुग्ण –
एकीकडे कोरोनाची रुग्ण संख्या घटत असताना दुसरीकडे रुग्ण संख्येत किंचित वाढ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असले तरी मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. आज 7 हजार 142 नव्या रुग्ण आढळून आले. त्यापैकी 92 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.83 टक्के इतके आहे. 20 हजार 222 इतके रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या 75 लाख 93 हजार 291 इतकी आहे. हे प्रमाण 97.07 टक्के इतके आहे.
देशात कोरोनाचे ६७ हजार ८४ नवे रुग्ण
देशातील कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६७ हजार ८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,२४१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १ लाख ६७ हजार ८८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
सध्या देशात ७ लाख ९० हजार ७८९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पॉझिटिव्हिटी रेट ४.४४ टक्क्यांवर आला आहे. देशात आतापर्यंत ५ लाख ६ हजार ५२० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
याआधीच्या दिवशी ७१ हजार ३६५ कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर, १ हजार २१७ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, १ लाख ७२ हजार २११ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. पंरतु, कोरोनामृत्यूची वाढती संख्या चिंतेत भर टाकणारी आहे. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९६.७० टक्क्यांवर होता. दैनंदिन कोरोनासंसर्गदर ४.५४ टक्के तर, आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ७.५७ टक्के नोंदवण्यात आला होता.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)