बीड जिल्ह्यात 41 कोरोना बाधित:जिल्ह्यात 177 रुग्ण बरे झाले
राज्यात 9666 तर देशात 83 हजार 876 कोरोना बाधित
बीड जिल्ह्यात आज दि 7 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 708 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 41 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 667 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 10 आष्टी 7 बीड 7 धारूर 3 गेवराई 2 केज 2 माजलगाव 1 परळी 9 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात 177 रुग्णांना डिस्चार्ज
काल बीड जिल्ह्यात 177 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे
बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 लाख 8018 झाली असून 2859 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे काल जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर 4.01 % होता जिल्ह्याचा रिकवरी रेट 96.68 % टक्के असून 1 लाख 4436 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत बीड जिल्ह्यात सध्या 723 रुग्णांवर उपचार सुरू आहेत,
राज्यात रुग्ण संख्येत घट:९ हजार ६६६ नवीन रूग्णांची नोंद
राज्यात दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ९ हजार ६६६ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील मृत्यूदर १.८३ टक्के इतका आहे. तर मागील २४ तासांत २५ हजार १७५ इतके रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच राज्यात आतापर्यंत एकूण ७५ लाख ३८ हजार ६११ इतके रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६० टक्के इतके आहे.
दि ५ फेब्रुवारी रोजी राज्यात ११ हजार ३९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली .तर २१ हजार ६७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. कालच्या रूग्णांची तुलना केली असता आज राज्यात २ हजार रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
देशात कोरोनाचे नवे ८३ हजार ८७६ नवे रुग्ण
देशातील कोरोनाची तिसरी लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत कोरोनाची रुग्णसंख्या (daily COVID19 ) १ लाखाच्या खाली आली.
२४ तासांत कोरोनाचे नवे ८३ हजार ८७६ नवे रुग्ण आढळून आले. तर ८९५ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात १ लाख ९९ हजार ५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात ११ लाख ८ हजार ९३८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट ७.२५ टक्क्यांवर आला आहे. देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा ५ लाख २ हजार ८७४ वर पोहोचला आहे.
याआधीच्या दिवशी कोरोनाचे १ लाख ७ हजार ४७४ रुग्ण आढळून आले होते. तर ८६५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. रविवारी पॉझिटिव्हिटी रेट ७.४२ टक्के होता.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)