बीड जिल्ह्यात कोरोना कंट्रोलमध्ये:जिल्ह्यात 233 रुग्ण बरे झाले
राज्यात 13,394 तर देशात 1 लाख 1,7,4,74 कोरोना बाधित
बीड जिल्ह्यात आज दि 6 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1196 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 48 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1148 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 8 आष्टी 4 बीड 8 गेवराई 2 केज 9 माजलगाव 6 परळी 3 पाटोदा 6 शिरूर 1 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात 233 रुग्णांना डिस्चार्ज
काल बीड जिल्ह्यात 233 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे
बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 लाख 7970 झाली असून 2858 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे काल जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर 7.22 % होता जिल्ह्याचा रिकवरी रेट 95.56 % टक्के असून 1 लाख 4259 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत बीड जिल्ह्यात सध्या 853 रुग्णांवर उपचार सुरू आहेत,
राज्यात 1,394 रुग्णांची नोंद
राज्यात आज दिवसभरात 1,394 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 21,677 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 77 लाख 94 हजार 034 एवढी झाली आहे. त्यापैकी 75 लाख 13 हजार 436 रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट 96.40 टक्के आहे.
राज्यात आज 68 जणांचा मृत्यू झाला असून आजवर एकूण 1,43,008 रुग्ण मृत्युमुखी झाले आहे. राज्याचा कोरोनामृत्यूदर 1.83 टक्के आहे. सध्या राज्यात 2,447 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. तर 7,95,442 जण होम क्वारंटाईन आहेत.
भारतात 1,07,474 कोरोना रुग्णांची नोंद
भारतात कोरोना रुग्णांची संख्येमध्ये भर पडतच आहे. भारतात गेल्या 24 तासांत 1,07,474 कोरोना रुग्णांची (Covid Patient)नोंद झाली आहे.
एकूण 2,13,246 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर 865 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशभरात 12,25,011 सक्रिय रुग्ण असून कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५,०१,९७९ पर्यंत पोहोचली आहे. सध्या देशभरात कोरोना वाढीचा दर 7.42% आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)