बीड जिल्ह्यात 115 कोरोना बाधित:जिल्ह्यात 149 रुग्ण बरे झाले
राज्यात 13840 तर देशात 1 लाख 27952 कोरोना बाधित
बीड जिल्ह्यात आज दि 5 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1592 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 115 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1477 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 10 आष्टी 23 बीड 19 धारूर 2 गेवराई 12 केज 9 माजलगाव 6 परळी 19 पाटोदा 7 शिरूर 5 वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात 149 रुग्णांना डिस्चार्ज
काल बीड जिल्ह्यात 149 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे
बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 लाख 7855 झाली असून 2858 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे काल जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर 6.93 % होता जिल्ह्याचा रिकवरी रेट 96.45% टक्के असून 1 लाख 4026 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत बीड जिल्ह्यात सध्या 971 रुग्णांवर उपचार सुरू आहेत,
राज्यात 13 हजार 840 नवे रुग्ण
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाचे 13 हजार 840 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात काल (3 जानेवारी) 15 हजार 252 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. आज यामध्ये किंचितशी घट झाली असल्याचं दिसून येत आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात 27 हजार 891 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 74,91,759 नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 96.26 टक्के एवढा आहे.
दरम्यान, राज्यात आज 81 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या 1.83 टक्के इतका आहे.
राज्यात गेल्या 24 तासात एकही ओमिक्रॉन व्हेरिएंट बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. आजपर्यंत राज्यात एकूण 3334 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
देशात कोरोनाचे १ लाख २७ हजार ९५२ नवे रुग्ण
देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येचा आलेख हळूहळू मंदावत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख २७ हजार ९५२ नवे रुग्ण आढळून आले. तर १,०५९ जणांचा मृत्यू झाला.
दिवसभरात २ लाख ३० हजार ८१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात कोरोनाचे १३ लाख ३१ हजार ६४८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट ७.९८ टक्क्यांवर आला आहे. देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा ५ लाख १ हजार ११४ वर पोहोचला आहे.
याआधीच्या दिवशी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली होती. गुरूवारी १ लाख ४९ हजार ३९४ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, १ हजार ७२ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, २ लाख ४६ हजार ६७४ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. बुधवारी देशात १ लाख ७२ हजार ४३३ कोरोनाबाधितांची भर पडली होती. या तुलनेत गुरूवारी दैनंदिन कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सौम्य घट नोंदवण्यात आली. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९५.३९ टक्क्यांवर पोहचला. तर, दैनंदिन कोरोना संसर्गदर ९.२७ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर १२.०३ टक्के नोंदवण्यात आला होता.
राज्यातील कोरोनाची तिसरी लाट मार्च मध्ये संपेल-टोपे
कोरोना संसर्गाच्या चढत्या आलेखाला आता उतार लागल्याचे दिसत आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ात राज्यातील कोरोनाची तिसरी लाट संपेल, असा आशावाद आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला.
जालना येथे पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले की, कोरोना परिस्थितीवर मंत्रिमंडळाची आढावा बैठक झाली. त्यातील आकडेवारीनुसार राज्यातील कोरोना आकडेवारीमध्ये मोठी घट दिसत आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध कमी करण्याकडे सरकारचा कल आहे.
सध्या निर्बंधांत वाढ नाही
राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या 48 हजारांच्या आसपास होती. ती आता 10 ते 15 हजारांवर आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि रायगडमध्ये कोरोना रुग्ण कमी झाले आहेत. मुंबईसारख्या मोठय़ा शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या पाचशे-सहाशेवर आली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कोणतेही निर्बंध वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार नाही. दर आठवडय़ाला टप्प्याटप्प्याने निर्बंध कमी झालेले पाहायला मिळतील असेही राजेश टोपे म्हणाले.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)