बीड जिल्ह्यात 116 कोरोना बाधित:जिल्ह्यात 164 रुग्ण बरे झाले
राज्यात 15252 तर देशात 1 लाख 49394 कोरोना बाधित
बीड जिल्ह्यात आज दि 4 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1675 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 116 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1559 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 18 आष्टी 3 बीड 24 धारूर 4 गेवराई 11 केज 10 माजलगाव 8 परळी 31 पाटोदा 2 शिरूर 1 वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात 164 रुग्णांना डिस्चार्ज
काल बीड जिल्ह्यात 164 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे
बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 लाख 7739 झाली असून 2857 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे काल जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर 7.40 % होता जिल्ह्याचा रिकवरी रेट 96.41% टक्के असून 1 लाख 3877 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत बीड जिल्ह्यात सध्या 1005 रुग्णांवर उपचार सुरू आहेत,
राज्यात कोरोनाच्या 15 हजार 252 नव्या रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 15 हजार 252 नव्या रुग्णांची भर पडली असून 75 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 30 हजार 235 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1701 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 75 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 75 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 74 लाख 63 हजार 868 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.07 टक्के आहे.
देशात १ लाख ४९ हजार ३९४ नवे रुग्ण
देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत १ लाख ४९ हजार ३९४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,०७२ जणांचा मृत्यू (Covid deaths) झाला आहे.
याआधीच्या दिवशीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या १३ टक्क्यांनी कमी आहे. दिवसभरात २ लाख ४६ हजार ६७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात १४ लाख ३५ हजार ५६९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दैंनदिन पॉझिटिव्हिटी रेट ९.२७ टक्के आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)