बीड जिल्ह्यात 110 कोरोना बाधित:जिल्ह्यात 240 रुग्ण बरे झाले
राज्यात 27971 तर देशात 1 लाख 61386 कोरोना बाधित
बीड जिल्ह्यात आज दि 2 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1802 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 110 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1692 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 25 आष्टी 11 बीड 25 धारूर 4 गेवराई 9 केज 4 माजलगाव 5 परळी 17 पाटोदा 1 शिरूर 8 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात 240 रुग्णांना डिस्चार्ज
काल बीड जिल्ह्यात 240 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे
बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 लाख 7480 झाली असून 2852 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे काल जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर 10.47 % होता जिल्ह्याचा रिकवरी रेट 96.23% टक्के असून 1 लाख 3428 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत बीड जिल्ह्यात सध्या 1200 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
राज्यात २७ हजार ९७१ नव्या कोरोना रुग्णांची
महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २७ हजार ९७१ नव्या कोरोना रुग्णांची आणि ६१ मृत्यूची नोंद झाली.
राज्यातले ५० हजार १४२ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ३१२५ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी १६७४ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ७ कोटी ४३ लाख ३३ हजार ७२० कोरोना चाचण्यांपैकी ७६ लाख ८३ हजार ५२५ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ७६ लाख ८३ हजार ५२५ कोरोना रुग्णांपैकी ७२ लाख ९२ हजार ७९१ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४२ हजार ५२२ मृत्यू झाले तसेच ३८६८ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना संकटामुळे ११ लाख ४९ हजार १८२ होम क्वारंटाइन तर ३३७५ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर १.८५ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.३४ टक्के आणि रिकव्हरी रेट ९४.९१ टक्के आहे.
देशात कोरोनाचे १ लाख ६१ हजार ३८६ नवे रुग्ण
देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. पण मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख ६१ हजार ३८६ नवे रुग्ण आढळून आले.
तर १,७३३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २ लाख ८१ हजार १०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात १६ लाख २१ हजार ६०३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्याचा पॉझिटिव्हिटि रेट ९.२६ टक्क्यांवर आला आहे.
याआधीच्या दिवशीही देशात कोरोनाबाधितांची संख्या २ लाखांहून कमी आढळली होती. पंरतु, कोरोना मृत्यूच्या वाढत्या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी दिवसभरात १ लाख ६७ हजार ५९ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, १ हजार १९२ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, २ लाख ५४ हजार ७६ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. यापूर्वी १० जानेवारीला जवळपास १ लाख ९४ हजार दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद घेण्यात आली होती.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)