महाराष्ट्रमुंबई

आजपासून निर्बंध हटवण्यात आले:रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू,लग्नासाठी 200 व्यक्तींची मर्यादा

राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकली आणि महिन्याअखेरीस ओसरली आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनची रुग्ण संख्या आता आटोक्यात आली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात राज्य सरकारने नाईट कर्फ्यू आणि कडक निर्बंध लागू केले होते.

पण, आता परिस्थितीत आटोक्यात आल्यामुळे सर्व निर्बंध हटवण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत हॉटेल (hotel) सुरू करण्यास परवानगी दिली आहे जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकली होती. एवढंच नाहीतर ओमायक्रॉनचा समूह संसर्ग सुरू झाला होता. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली होती. राज्यात सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. पण,आज 1 फेब्रुवारी 2022 पासून कोविड संसर्ग रोखण्यासंदर्भातील राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुधारित आदेश जारी करण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी जे निर्बंध लागू करण्यात आले होते, ते आता हटवण्यात आले आहे.

नियमावलीमध्ये बदल!

  • राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री उशीरापर्यंत सुरू राहणार, 50 टक्के क्षमतेची परवानगी – लग्नासाठी 200 व्यक्तींची मर्यादा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत बंदिस्त जागेत असो किंवा खुले असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या २०० व्यक्तींपुरती मर्यादित असेल. – मैदाने, उद्याने आणि पर्यटन स्थळे 50 टक्के क्षमतेनं सुरू राहणार – सलून 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. – राज्यातील थिएटर फक्त 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील – स्विमिंग पूल, स्पा, जिम सुरू – मुंबई लोकल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *