बीड जिल्ह्यात 106 कोरोना बाधित:जिल्ह्यात 292 रुग्ण बरे झाले
राज्यात 22444 तर देशात 2 लाख 9918 कोरोना बाधित
बीड जिल्ह्यात आज दि 31 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 807 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 106 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 701 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 23 आष्टी 14 बीड 23 धारूर 9 गेवराई 1 केज 7 माजलगाव 6 परळी 8 पाटोदा 6 शिरूर 5 वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात 292 रुग्णांना डिस्चार्ज
काल बीड जिल्ह्यात 292 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे
बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 लाख 7259 झाली असून 2849 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे काल जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर 9.62 % होता जिल्ह्याचा रिकवरी रेट 95.96% टक्के असून 1 लाख 2931 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत बीड जिल्ह्यात सध्या 1479 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
रविवारी राज्यात 22 हजार 444 नवे कोरोनाबाधित
मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
शनिवारी राज्यात 27,971 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी यामध्ये आणखी घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 22 हजार 444 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 39,015 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.14 टक्के इतका झाला आहे. रविवारी राज्यात 50 रुग्णाची कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.85 टक्के एवढा झाला आहे. राज्यात 2,27,711 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 77,05,969 झाली आहे. सध्या राज्यात 12,61,198 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,332 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
देशात २४ तासात 2 लाख 09 हजार 918 नव्या रुग्णांची नोंद
देशात मागील २४ तास कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत वाढ झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. देशात मागील २४ तासात 2लाख 09 हजार 918 नव्या केसेसची नोंद झाली, तर 959 मृत्यूची नोंद झाली.
देशातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या १८ लाख ३१ हजार २६८ वर गेली आहे. देशातील पॉझिटिव्हीटी रेट पुन्हा वाढला असून तो 15.77% झाला आहे. देशात आतापर्यंत 1,66,03,96,227 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
दरम्यान, अनेक राज्यातील परिस्थिती सुधारत असून सदर राज्यांनी प्रतिबंध हटविण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक सरकारने बहुतांश प्रतिबंध हटविण्याचा निर्णय शनिवारी घेतला होता. आजपासून येथील रात्रीची संचारबंदी देखील रद्द केली जात आहे. शाळाही उघडण्यात येणार आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)