बीड जिल्ह्यात 177 कोरोना बाधित:जिल्ह्यात 284 रुग्ण बरे झाले
राज्यात 27971 तर देशात 2 लाख 34281 कोरोना बाधित
बीड जिल्ह्यात आज दि 30 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1839 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 177 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1662 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 39 आष्टी 16 बीड 31 धारूर 2 गेवराई 9 केज 20 माजलगाव 7 परळी 18 पाटोदा 18 शिरूर 7 वडवणी 10 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात 284 रुग्णांना डिस्चार्ज
काल बीड जिल्ह्यात 284 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे
बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 लाख 7082 झाली असून 2849 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे काल जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर 9.63 % होता जिल्ह्याचा रिकवरी रेट 95.85% टक्के असून 1 लाख 2639 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत बीड जिल्ह्यात सध्या 1594 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
राज्यात करोनाच्या २७,९७१ नवीन रुग्णांची नोंद
मुंबई | राज्यात दिवसभरात करोनाच्या २७,९७१ नवीन रुग्णांची नोंद झाली व ६१ रुग्णांचा मृत्यू झाला. नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात दिवसभरात ५०,१४२ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या २,४४,३४४ इतकी झाली आहे.राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे ८५ रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या ३१२५ झाली आहे.
देशात 2 लाख 34 हजार 281 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढ – उतार यला मिळत आहे. मात्र कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 34 हजार 281 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
कालच्या तुलनेत आज 1251 ने कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. मात्र मृतांच्या संख्येत आजही काहीशी वाढ झाली आहे. काल दिवसभरात 893 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 3 लाख 52 हजार 784 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सध्या देशात 18 लाख 84 हजार 937 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामुळे देशातील कोरोना रुग्णांच्या तुलनेत सक्रीय रुग्णांची संख्या ही 4.59 टक्के इतकी आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा 14.50 टक्क्यांवर पोहोचला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनामुळे आत्तापर्यंत गमावणाऱ्या रुग्णांची संख्या 4 लाख 94 हजार 91 झाली आहे. तर आतापर्यंत 3 कोटी 87 लाख 13 हजार 494 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)