बीड

बीड जिल्ह्यात 235 कोरोना बाधित:अडीचशेच्यावर रुग्ण बरे झाले

राज्यात 24948 तर देशात 2 लाख 35532 कोरोना बाधित

बीड जिल्ह्यात आज दि 29 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2408 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 235 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2176 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 39 आष्टी 13 बीड 49 धारूर 6 गेवराई 15 केज 17 माजलगाव 20 परळी 21 पाटोदा 30 शिरूर 9 वडवणी 13 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात 257 रुग्णांना डिस्चार्ज

काल बीड जिल्ह्यात 257 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे
बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 लाख 6850 झाली असून 2849 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे काल जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर 10.83 % होता जिल्ह्याचा रिकवरी रेट 95.79% टक्के असून 1 लाख 2355 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत बीड जिल्ह्यात सध्या 1646 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

राज्यात दिवसभरात २४,९४८ नवीन रुग्णांची नोंद

राज्यातील संसर्ग दर १०.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा (१५.८८ टक्के) कमी आहे. राज्यात दिवसभरात २४,९४८ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात २४ हजार ९४८ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर १०३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून कोरोना आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली असून, राज्यातील काही शहरात अजूनही मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात आज २४,९४८ रुग्ण आढळून आले असले, तरी बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवसभरात ४५,६४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यात ७२,४२,६४९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
राज्यात दिवसभरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १०३ आहे. राज्याचा करोना मृत्यूदर १.८६ टक्के इतका असून, रिकव्हरी रेट ९४.६१ टक्के इतका आहे

२४ तासांत कोरोनाचे २ लाख ३५ हजार ५३२ नवे रुग्ण

देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या वाढीचा आलेख हळूहळू मंदावत आहे. पण मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक बनले आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ३५ हजार ५३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

तर ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३ लाख ३५ हजार ९३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात २० लाख ४ हजार ३३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट १३.३९ टक्के एवढा आहे.

याआधीच्या दिवशी दिवसभरात २ लाख ५१ हजार २०९ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ६२७ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान ३ लाख ४७ हजार ४४३ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९३.६० टक्के, तर दैनंदिन कोरोना संसर्गदर १५.८८ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर १७.४७ टक्के नोंदवण्यात आला होता.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *