बीड

बीड जिल्ह्यात 295 कोरोना बाधित:राज्यात 33914 तर देशात 2 लाख 85914 रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 26 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2371 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 295 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2076 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 76 आष्टी 25 बीड 38 धारूर 3 गेवराई 17 केज 25 माजलगाव 43 परळी 52 पाटोदा 1 शिरूर 5 वडवणी 10 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात 106 रुग्णांना डिस्चार्ज

काल बीड जिल्ह्यात 106 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे
बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 लाख 6240 झाली असून 2847 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे काल जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर 11.12% होता जिल्ह्याचा रिकवरी रेट 95.79% टक्के असून 1 लाख 1656 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत बीड जिल्ह्यात सध्या 1737 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

राज्यात कोरोनाच्या 33 हजार 914 नव्या रुग्णांची भर

मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 33 हजार 914 नव्या रुग्णांची भर पडली असून 86 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 30 हजार 500 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आज 13 ओमायक्रॉनबाधितांची नोंद

राज्यात आज 13 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 2858 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1534 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

राज्यात आज 86 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आज 86 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 70 लाख 20 हजार 436 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.07 टक्के आहे.

देशात कोरोनाचे 2 लाख 85 हजार 914 नवीन रुग्ण

देशात (India) प्राणघातक कोरोना विषाणू(Coronavirus) च्या साथीच्या रुग्णांमध्ये कालच्या तुलनेत आज पुन्हा वाढ झाली आहे.
गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 2 लाख 85 हजार 914 नवीन रुग्ण आढळले असून 665 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील रुग्णांचा दैनंदिन सकारात्मकता दर (Corona Positivity Rate) आता 16.16 टक्के इतका झाला आहे. मोठी गोष्ट म्हणजे कालच्या तुलनेत आज देशात 11.7 टक्के जास्त प्रकरणे समोर आली आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.

सक्रिय प्रकरणांची संख्या 22 लाख 23 हजार 18
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 22 लाख 23 हजार 18 झाली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 91 हजार 127 झाली आहे. आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात दोन लाख 99 हजार 73 लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 73 लाख 70 हजार 971 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *