बीड

बीड जिल्ह्यात 237 कोरोना बाधित:राज्यात 28286 तर देशात 2 लाख 55874 रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 25 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2132 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 237 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1895 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 59 आष्टी 27 बीड 64 धारूर 1 गेवराई 6 केज 10 माजलगाव 33 परळी 21 पाटोदा 9 शिरूर 3 वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात 118 रुग्णांना डिस्चार्ज

काल बीड जिल्ह्यात 118 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे
बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 लाख 6003 झाली असून 2847 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे जिल्ह्याचा रिकवरी रेट 95.79% टक्के असून 1 लाख 1550 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत बीड जिल्ह्यात सध्या 1606 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

राज्यात दिवसभरात २८ हजार २८६ नवीन करोनाबाधित

राज्यात काल दिवसभरात २८ हजार २८६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ३६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८ टक्के एवढा आहे. याशिवाय राज्यात २१ हजार ९४१ रूग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत

राज्यात आजपर्यंत एकूण ७०,८९,९३६ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.०९ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज रोजी एकूण २,९९,६०४ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ७५,३५,५११ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४२१५१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.

५० हजार रुग्ण संख्या घटली आज २ लाख ५५ हजार ८७४ नवे रुग्ण

देशातील कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ५५ हजार ८७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. एका आठवड्यातील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

तर याआधीच्या दिवशीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या ५०,१९० ने कमी आहे. पण दिवसभरात ६१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात २२ लाख ३६ हजार ८४२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत २ लाख ६७ हजार ७५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट १५.५२ टक्के आहे.

याआधीच्या दिवशी कोरोना तपासण्यांचे प्रमाण मंदावल्याने दिवसभरात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत २७ हजार ४६९ ने घट नोंदवण्यात आली होती. रविवारी दिवसभरात ३ लाख ६ हजार ६४ कोरोनाग्रस्तांची भर पडली होती. तर, ४३९ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान २ लाख ४३ हजार ४९५ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९३.०७ टक्क्यांपर्यंत घसरला होता.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *