शेतकऱ्यांनो ऑनलाईन ॲपवर पीक पेरा नोंदणीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
बीड, दि. 24 (जि. मा. का.)जिल्ह्यात किमान आधारभूत खरेदी योजने अंतर्गत एफ. सी. आयच्या वतीने हंगाम 2021-2022 मधील तूर नोंदणी व खरेदी करण्यासाठी प्रस्तावित एकविस खरेदी केंद्राना मंजूरी दिलेली असून तूर खरेदीकरिता दि. 20 डिसेंबर 2021 पासून शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. हंगाम 2021-2022 पासून राज्य शासनाने शेतातील पीक पेरा नोंदणी हे ऑनलाईन ॲपवर नोंदणी करण्यात आलेली नाही,त्यामुळे राज्य शासनाने ऑनलाईन पीक पेरा नोंदणी करण्याकरिता दि. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
तरी तालुक्यातील सर्व शेतक-यांनी नोंदणीसाठी आवश्यक ती कागदपत्रे आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक, ऑनलाईन सातबारा उतारा पीक पेरासह आणि चालू असलेला मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्र नोंदणीसाठी आवश्यक आहेत. तरी बीड तालुक्यातील सर्व शेतक-यांनी खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या शेतमालाची नोंदणी करुन शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी मिलिंद कापुरे यांनी केले आहे.