बीड जिल्ह्यात 290 कोरोना बाधित:राज्यात 46393 रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 23 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2144 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 290 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1854 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 88 आष्टी 27 बीड 38 धारूर 5 गेवराई 22 केज 31 माजलगाव 20 परळी 42 पाटोदा 7 शिरूर 4 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात 1372 रुग्णांवर उपचार सुरू
काल बीड जिल्ह्यात 64 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे
बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 लाख 5536 झाली असून 2845 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे जिल्ह्याचा रिकवरी रेट 96 टक्के असून 1 लाख 1319 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत बीड जिल्ह्यात सध्या 1372 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
राज्यात कोरोनाच्या 46 हजार 393 नव्या रुग्णांची भर
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 46 हजार 393 नव्या रुग्णांची भर पडली असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 30,795 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल राज्यात कोरोनाच्या 48 हजार 270 रुग्णांची नोंद झाली होती म्हणजे आज कालच्या पेक्षा दीड हजाराने रुग्ण संख्या कमी झाली आहे.
राज्यात आज 416 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 416 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 2759 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1225 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 48 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 48 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.91 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 70 लाख 40 हजार 618 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.03 टक्के आहे
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)