बीड

बीड जिल्ह्यात 307 कोरोना बाधित:राज्यात 48270 तर देशात 3 लाख 37704 रुग्ण

बीड जिल्ह्यात 307 कोरोना बाधित:राज्यात 48270 तर देशात 3 लाख 37704 रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 22 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2414 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 307 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2107 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 81 आष्टी 16 बीड 46 धारूर 8 गेवराई 19 केज 20 माजलगाव 32 परळी 41 पाटोदा 19 शिरूर 8 वडवणी 17 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात करोनाच्या ४८ हजार २७० नव्या रुग्णांची भर

राज्यातील करोनाची रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात करोनाच्या ४८ हजार २७० नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात दिवसभरात ४२, ३९१ रुग्ण करोवर मात करुन घरी परतले आहेत.
दरम्यान, गुरुवारी राज्यात करोनाच्या ४६ हजार १९७ करोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आता पुन्हा रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाचे ५००८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत शुक्रवारी १२,९१३ रुग्णांनी करोनवर मात केली आहे. मुंबईत सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १४,१७८ आहे.

१४४ ओमायक्रॉनबाधितांची नोंद

राज्यात शुक्रवारी १४४ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत २३४३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११७१ रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.

राज्यात शुक्रवारी ५२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्याचा मृत्यूदर १.९१ टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत ७० लाख ९ हजार ८२३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४७ टक्के आहे.

देशात तीन लाख 37 हजार 704 नवीन बाधितांची नोंद

नवी दिल्ली : एकीकडे देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच दुसरीकडे दिलासादायक बातमी समोर आली आहे. काल दिवसभरात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट झाली आहे. पण ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव भारतात वेगाने पसरत आहे.

काल दिवसभरात देशात तीन लाख 37 हजार 704 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 488 बाधितांचा मृत्यू झाला आहे. ही दैनंदिन रुग्णवाढ काल तीन लाख 47 हजार 254 एवढी होती. देशात आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या 10 हजार 50 बाधितांची नोंद झाली आहे. देशातील दैनिक सकारात्मकता दर आता 17.22 टक्के एवढा आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या 21 लाख 13 हजार 365 झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या चार लाख 88 हजार 884 झाली आहे. आकडेवारीनुसार, काल दिवसभरात दोन लाख 42 हजार 676 लोक बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत तीन कोटी 63 लाख 1 हजार 482 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *