बीड जिल्ह्यात 295 कोरोना बाधित:देशात आजही तीन लाख पार तर राज्यात 46197 बाधित
बीड जिल्ह्यात आज दि 21 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2381 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 295 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2086 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 36 आष्टी 13 बीड 113 धारूर 11 गेवराई 9 केज 20 माजलगाव 18 परळी 59 पाटोदा 3 शिरूर 7 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात 46 हजार 197 नव्या रुग्णांची भर
मुंबई : राज्यातील ओमायक्रॉन च्या रुग्णांच्या संख्येत रोज चढ-उतार होत असल्याचं दिसून येतंय.
गुरुवारी राज्यात 125 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली असून हे सर्व रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. त्या आधी बुधवारी 214 ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत आजची संख्या जवळेपास 90 ने कमी आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण 2199 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 1144 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 865 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद ही पुणे शहरात करण्यात आली आहे. तर त्या खालोखाल मुंबईचा क्रमांक लागत असून त्या ठिकाणी 687 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील स्थिती
गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 46 हजार 197 नव्या रुग्णांची भर झाली असून 37 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 52, 025 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 37 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.92 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 69 लाख 67 हजार 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.52 टक्के आहे.
देशात कोरोना विषाणूचे 3 लाख 47 हजार 254 नवीन रुग्ण
Coronavirus Cases in India : देशात प्राणघातक कोरोना (Corona) व्हायरसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
यासोबतच कोरोनाचा सर्वात वेगाने पसरणारा प्रकार असलेल्या ओमायक्रॉन प्रकाराच्या (Omicron Variant) रुग्णांमध्येही वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे तीन लाख 47 हजार 254 नवीन रुग्ण आढळले असून 703 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारांच्या आतापर्यंत 9,692 रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील दैनदिंन रुग्णवाढीचा दर 17.94 टक्के आहे.
सक्रिय प्रकरणांची संख्या 20 लाख 18 हजार 825 वर पोहोचली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 20 लाख 18 हजार 825 झाली आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 88 हजार 396 झाली आहे. आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरात 2 लाख 51 हजार 777 लोक कोरोनोतून बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 60 लाख 58 हजार 806 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)