बीड जिल्ह्यात 125 कोरोना बाधित:राज्यात 42462 तर देशात 2 लाख 71202 रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 16 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1814 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 125 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1689 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 24 आष्टी 9 बीड 23 धारूर 3 गेवराई 8 केज 3 माजलगाव 10 परळी 26 पाटोदा 10 शिरूर 5 वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात कोरोनाच्या 42,462 नव्या रुग्णांची भर
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 42,462 नव्या रुग्णांची भर झाली असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 39,646 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सलगपणे राज्यात 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होतेय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.
राज्यात 125 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 125 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1730 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 879 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 23 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 23 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.97 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 67 लाख 60 हजार 514 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 टक्के आहे. सध्या राज्यात 22 लाख 108 रुग्ण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 6102 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7,17,64,226 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
देशात २ लाख ७१ हजार २०२ बाधितांची भर
देशात कोरोना रुग्णवाढीचा मागील ८ दिवसात कमालीचा वाढला आहे. देशातील आकडेवारीचा विचार करता तिसरी लाट आल्याच्या सदृश्य परिस्थिती आहे.
देशात काल (ता. १५) २ लाख ७१ हजार २०२ बाधितांची भर पडली आहे, तर ३१४ जणांचा कोरोनाने बळी गेला.१ लाख ३८ हजार ३३१ जणांनी कोरोनावर विजय मिळवला. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी (ता.१५) २ हजार ३६९ अधिक कोरोना केसेस वाढल्या आहेत.
देशात १५ लाख ५० हजार ३७७ ॲक्टिव्ह केसेस आहेत. देशात ८ जानेवारीपासून १२ लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यामुळे देशाच्या दैनंदिन कोरोना संसर्ग दरात दोन टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत कोरोना संसर्ग दर १६.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
शनिवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९४.८३ टक्क्यांपर्यंत घसरला.देशाचा दैनंदिन कोरोनासंसर्गदर १६.६६ टक्के, तर आठवड्याचा कोरोना संसर्गदर १२.८४ टक्के नोंदवण्यात आला आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)