बीड जिल्ह्यात 64 कोरोना बाधित:राज्यात 43211 तर देशात 2 लाख 68833 रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 15 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1359 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 64 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1295 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 18 आष्टी 5 बीड 12 धारूर 2 गेवराई 5 केज 6 माजलगाव 4 परळी 11 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
.
राज्यात कोरोनाच्या 43, 211 नव्या रुग्णांची भर
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 43, 211 नव्या रुग्णांची भर झाली असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 33, 356 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात अधिक रुग्णांची भर पडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.
राज्यात 228 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 238 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1605 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 859 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 19 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.98 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 67 लाख 17 हजार 125 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 टक्के आहे.
देशात २ लाख ६८ हजार ८३३ नवे रुग्ण
देशातील कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने उंचावत आहे. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णसंख्येत ४,६३१ ने वाढ झाली आहे.
गेल्या २४ तासांत देशात २ लाख ६८ हजार ८३३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, ४०२ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासांत १ लाख २२ हजार ६८४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १६.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, देशात ओमायक्रॉन रुग्णसंख्या ६,०४१ वर पोहोचली आहे. सध्या देशात कोरोनाचे १४ लाख १७ हजार ८२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
याआधीच्या चोवीस तासांमध्येच दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत ६.७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. गुरूवारी दिवसभरात २ लाख ६४ हजार २०२ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ३१५ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान १ लाख ९ हजार ३५४ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९५.२० टक्के होता. बुधवारी दिवसभरात २ लाख ४७ हजार ४१७ कोरोनाबाधित आढळले होते.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)