बीड जिल्ह्यात 64 कोरोना बाधित:राज्यात 46406 तर देशात 2 लाख 64202 रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 14 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2265 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 64 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2201 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 11 आष्टी 13 बीड 5 धारूर 2 गेवराई 1 केज 3 परळी 16 पाटोदा 3 शिरूर 1 वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत
महाराष्ट्रासह दिल्लीत सर्वाधिक रुग्ण
गेल्या 24 तासात महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यात महाराष्ट्रात 46,406 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 28,867 रुग्णांसह दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यापाठोपाठ कर्नाटक 25,005, बंगाल 23,467 आणि तामिळनाडू 20,911 रुग्ण आढळले आहेत. एकूण नवीन रुग्णांपैकी 54.74 टक्के या पाच राज्यांमधून आले आहेत. तर यातील महाराष्ट्रात 17.56 टक्के रुग्ण आहेत.
देशात 2,64,202 नवे कोरोनाबाधित रुग्ण
भारतात आज पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचा धडकी भरवणारा वेग यला मिळाला. गेल्या 24 तासात देशात 2,64,202 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. काल म्हणजेच गुरुवारच्या तुलनेत हा आकडा 6.7 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे भारतातील कोरोना संसर्गाचा दर आता 14.78 टक्क्यांवर पोहोचला आहे. यात देशात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ही 5,753 नोंदवण्यात आली आहे.
तर 219 जणांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या तुलनेत देशात आज 16,785 अधिक रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी देशात कोरोना रुग्णांची संख्या ही 2,47,417 इतकी होती. तर आज हीच संख्या 2,64,202 वर पोहचली आहे. यात 1,09,345 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. तर सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 12,72,073 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 219 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आत्तापर्यंत 4,85,350 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)