बीड जिल्ह्यात 45 कोरोना बाधित:राज्यात 46723 तर देशात 2 लाख 47,417 रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 13 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2033 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 45 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1988 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 16 आष्टी 4 बीड 6 गेवराई 2 केज 5 माजलगाव 4 परळी 5 पाटोदा 3 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात कोरोनाच्या 46,723 नव्या रुग्णांची भर
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 46,723 नव्या रुग्णांची भर झाली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 28,041 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात मंगळवारी 34,424 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत आज जवळपास 12 हजार अधिक रुग्णांची भर पडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे
राज्यात आज 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 66 लाख 49 हजार 111 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.52 टक्के आहे.
राज्यात 86 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 86 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1367 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 734 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
देशात २ लाख ४७ हजार ४१७ नवीन बाधितांची नोंद
देशातील करोना संसर्ग आता अधिक झपाट्याने वाढताना दिसत आहे. याशिवाय ओमायक्रॉनच्या रूग्ण संख्येतही वाढ सुरूच आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात २ लाख ४७ हजार ४१७ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे.
ही संख्या काल आढळलेल्या करोनाबाधितांच्या २७ टक्के अधिक असल्याचे समोर आले आहे.
तसेच, ३८० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याचे देखील समोर आले असून, आतापर्यंत देशभरात ४,८५,०३५ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.
याशिवाय ८४ हजार ८२५ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. तर, सध्या अॅक्टिव्ह केसेसची संख्या ११,१७,५३१ वर पोहचली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १३.११ टक्के आहे. याशिवाय, ५ हजार ४८८ ओमायक्रॉन बाधितही आढळून आले आहेत.
दरम्यान, ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य असली तरी, करोनाच्या या उत्परिवर्तित विषाणूचा संसर्ग म्हणजे सर्दीचा आजार नव्हे, हे लक्षात घेऊन लोकांनी दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे, असा इशारा करोना कृती गटाचे प्रमुख व निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील ३०० जिल्ह्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असून संसर्गदरही ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)