करोना रुग्णांच्या डिस्चार्ज धोरणात बदल:सात दिवसात सुट्टी तर टेस्टची गरज नाही
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारने करोना संसर्गितांच्या डिस्चार्ज धोरणात बदल केला आहे. करोना संसर्गाचे वर्गीकरण नव्या धोरणानुसार सौम्य आणि तीव्र अशा दोन गटात करण्यात आले आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी जाहीर केले.
तीव्र लक्षणे असणाऱ्या गटात ऑक्सिजनच्या पुरवठ्याशिवाय शरीरातील ऑक्सिजन पातळी सलग तीन दिवस 93 टक्क्यापेक्षा अधिक रहात असेल तर तर अशा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येईल, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
सौम्य लक्षणे असणाऱ्यांना सलग तीन दिवस आपत्कालीन स्थिती आली नाही आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर सात दिवसांनी डिस्चार्ज देण्यात यावा. त्यांना डिस्चार्ज देण्यापुर्वी टेस्ट करण्याची गरज नसल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.