बीड

बीड जिल्ह्यात 38 कोरोना बाधित:राज्यात 34423 तर देशात 1 लाख 94,720 रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 12 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1804 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 38 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1766 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 3 बीड 9 धारूर 2 गेवराई 1 केज 4 माजलगाव 1 परळी 2 पाटोदा 6 शिरूर 7 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात कोरोनाचे ३४ हजार ४२४ रुग्ण

मुंबई : राज्यात काल कोरोनाचे ३४ हजार ४२४ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील एकूण मृतांचा आकडा १ लाख ४१ हजार ६६९ वर पोहोचला आहे.

गेल्या २४ तासांत १८ हजार ९६७ रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६६ लाख २१ हजार ७० झाली आहे.

राज्याचा कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण सध्या ९४.७५ टक्के इतके आहे. तर मृत्यू दर २.०२ इतका आहे.राज्यात आज रोजी एकूण २,२१,४७७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

काल 1 लाख 94 हजार 720 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अधिकच गडद होऊ लागले आहे. दरम्यान देशभरातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा सुमारे दोन लाखांच्या जवळ पोहोचला आहे. काल दिवसभरात 1 लाख 94 हजार 720 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 442 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात सध्या 9 लाख 55 हजार 319 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. सध्याचा कोरोना रुग्ण वाढीचा दर 11.05 टक्के एवढा झाला आहे. त्याचबरोबर देशभरातील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्गही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या 4 हजार 868 वर पोहोचली आहे.

कोरोनारीमुळे आतापर्यंत देशात एकूण 4 लाख 84 हजार 655 जणांनी आपला जीव गमावला आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *