बीड जिल्ह्यात 39 कोरोना बाधित:राज्यात 33470 तर देशात 1 लाख 68063 रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 11 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1120 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 39 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1081 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 9 आष्टी 1 बीड 8 केज 2 माजलगाव 3 परळी 8 पाटोदा 3 शिरूर 5 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात 33470 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात काल तब्बल 33 हजार 470 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 29 हजार 671 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने 40 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
राज्यात आज 31 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1247 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 467 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 8 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.03 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 2 हजार 259 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 66 लाख 2 हजार 103 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.95 टक्के आहे.
देशात २४ तासांत १ लाख ६८ हजार ६३ नवे रुग्ण
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. देशात गेल्या २४ तासांत १ लाख ६८ हजार ६३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तर २७७ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत सोमवारी रुग्णसंख्या कमी दिसून आली आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोनाने ४ लाख ८४ हजार २१३ जणांचा बळी गेला आहे.
देशात गेल्या २४ तासांत ६९,९५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ८ लाख २१ हजार ४४६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रोजचा पॉझिटिव्हिटी रेट १०.६४ टक्के एवढा आहे.दरम्यान, देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या ४,४६१ झाली आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)