बीड जिल्ह्यात 16 कोरोना बाधित:राज्यात 44388 तर देशात 1 लाख 79723 रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 10 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 879 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 16 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 863 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 6 बीड 4 माजलगाव 1 परळी 2 शिरूर 3 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात 44 हजार 388 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात आज तब्बल 44 हजार 388 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 15 हजार 351 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने 40 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
राज्यात 207 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 207 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1216 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 454 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 2 हजार 259 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 72 हजार 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के आहे.
कोरोनाचा देशभरात वेगाने फैलाव:१ लाख ७९ हजार ७२३ नवे रुग्ण
कोरोनाचा देशभरात वेगाने फैलाव होत आहे. गेल्या २४ तासांत १ लाख ७९ हजार ७२३ नवे रुग्ण आढळून आले. तर १४६ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात रविवारी (९ जानेवारी) १३ लाख ५२ हजार ७१७ चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात सध्या ७ लाख २३ हजार ६१९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचा रोजचा पॉझिटिव्हीटी म्हणजे संक्रमण दर १३.२९ टक्क्यांवर गेला आहे. दरम्यान, देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या ४,०३३ एवढी झाली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दरम्यान, दिल्लीतील सुमारे ३०० पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
याधीच्या दिवशी चोवीस तासात रूग्ण संख्येत तब्बल १ लाख ५९ हजार ६३२ ने भर पडली होती. ही २२४ दिवसांतील सर्वात उच्चांकी रूग्णसंख्या वाढ आहे. याशिवाय शनिवारी ३२७ रूग्ण दगावले तर ४० हजार ८६३ लोक बरे झाले असल्याचे आरोग्य खात्याकडून रविवारी सांगण्यात आले होते.
आज सोमवारपासून (दि.१०) कोरोना प्रतिबंधित लसीचा बूस्टर डोस दिला जात आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील व्याधिग्रस्तांना बूस्टर डोस दिला जात आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)