नागरिकांनो सावधान:नियमांचे उल्लंघन कराल तर 10 ते 50 हजारांचा दंड
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच नवी नियमावली जाहीर केली असून या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे,मात्र अनेकजण नियमांचे उल्लंघन करताना आढळून येतात,जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास प्रत्येक ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ते पुढीलप्रमाणे
सार्वजनिक व खाजगी वाहतूकी संदर्भाने कोविड अनुरूप वर्तन
- टॅक्सी/ऑटो आणि इतर खाजगी वाहतुक ऑपरेटर (बस/रेल्वे वगळता) :-
I. प्रत्येक फेरी नंतर वाहनांचे निर्जंतुकीकरण (Sanitize) करणे आवश्यक राहील.
II. वाहनात बसलेल्या प्रवाश्यांपैकी कुणाही एका प्रवाश्याने मास्क चा योग्य प्रकारे वापर न केल्यास, वाहन चालक व संबंधित प्रवासी दंड आकारण्यात येईल. - बसेस:-
I. बसमधील प्रवासी संख्या वेळोवेळी निर्धारित करण्यात येईल.
II. बसमध्ये बसलेल्या प्रवाश्यांपैकी कुणाही प्रवाश्याने मास्क चा योग्य प्रकारे वापर न केल्यास वा कोविड योग्य वर्तनाचे पालन न केल्यास संबंधित प्रवाशास प्रवासाची परवानगी देता येणार नाही.
III. कोविड योग्य वर्तनाचे अंमलबजावणी करण्याकरीता या आदेशानुसार वाहतूक कार्यालये/प्राधिकरणांना दंड आकारण्याची परवानगी असेल. - रेल्वे:-
I. सर्व प्रवाशांनी कोविड योग्य वर्तनाचे पालन करणे बंधनकारक असेल. रेल्वेने प्रवास करण्याकरीता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे मंजूर करण्यात आलेले युनिव्हर्सल पास बाळगणे अनिवार्य असेल. असे पास कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मिळतील. प्रवासी जर मास्क चा योग्य प्रकारे वापर करत नसेल वा कोविड योग्य वर्तनाचे पालन योग्यरितीने करत नसेल तर अशा प्रवाशास रेल्वेतून प्रवास करता येणार नाही.
III. रेल्वे प्राधिकरणास या आदेशानुसार कोविड योग्य वर्तनाचे पालन न करणाऱ्या दंड आकारण्याचे अधिकार असतील.
IV. रेल्वे प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांनी मास्कचा योग्य वापर करणे बंधनकारक असेल तसेच साधारण कोचमध्ये आसनक्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. (उभ्याने प्रवास करण्यास मनाई असेल).या नियमांचे उल्लंघन केल्यास रू.500 इतका दंड आकारण्यात येईल. - खाजगी कार:-
- खाजगी कारने अनेक प्रवासी प्रवास करत असल्यास (एकाच परिवारातील व्यक्ती नसल्यास) सर्वांनी मास्कचा
योग्य वापर करणे बंधनकारक असेल. नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर दंड आकारण्यात येईल.
शॉपिंग मॉल्स/सिनेमागृहे (मल्टीस्क्रिन व सिंगल स्क्रिन)
- सदर ठिकाणे या आदेशात नमुद वेळेत व दिवसांमध्ये सुरू राहतील यामध्ये वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या
आदेशाद्वारे बदल होऊ शकतो. - सदर ठिकाणी येणारे आगंतुक व कर्मचारी यांनी कोविड योग्य वर्तनाचे पालन करणे बंधनकारक असेल. सदर ठिकाणी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचारी/चालक/दुकानमालक/व्यवस्थापन यांचेवर कारवाई करण्यात येऊन दंड आकारण्यात येईल.जर
कोणतेही ग्राहक कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करीत नसल्यास सदर ग्राहकांना सेवा पुरविण्यात येऊ नयेत तथापि असे निदर्शनास आल्यास संबंधित ग्राहकासह संबंधित चालक दुकानमालक/व्यवस्थापन यांचेवरसुद्धा दंड आकारण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादींमध्ये कोविड अनुरूप वर्तनाची अमलबजावणी करण्यामध्ये नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.
E. शिक्षा/दंड/शास्ती
- या नियमांनुसार अपेक्षित असलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, नियमाचे उल्लंघन केल्याच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये 500/- इतका दंड करण्यात येईल.
- ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादींवर कोविड अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परिवास्तूत (जागेत), जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त, अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुद्धा रुपये 10,000/- इतका दंड करण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादींमध्ये कोविड अनुरूप वर्तनाची अमलबजावणी करण्यामध्ये नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.
- जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वत: च कोविड अनुरूप वर्तनाचे (CAB) किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपद्धतीचे (SOP) पालन करण्यात कसूर केली तर ती प्रत्येक प्रसंगी रूपये 50,000/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था
किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. - जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींनारूपये 500/- इतका दंड करण्यात येईल, तसेच सेवा पुरविणारे वाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये 500/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसूरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये 10,000/- इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास, एक
आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, संबंधित मालक एजन्सीचे लायसन्स काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल. - वरील नियमांचे वारंवार, गंभीर किंवा जाणीवपुर्वक उल्लंघन केल्यास भा.दं.वि. चे कलम 269/270 सह कलम 188 नुसार अटक आणि तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे समजण्यात येईल.
- कोविड अनुरूप वर्तणुकी संबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे, पालन करणे अनिवार्य असून त्यांचे उल्लंघन केल्यास वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार कोणऱ्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे, उल्लघंन करणाऱ्यावर इतार कोणताही दंड किंवा शास्ती लादता येईल. कोविड अनुरूप वर्तनाचे निमय/धोरणे, पवरीलप्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरूप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषय/मुद्दे, राज्य शासनाच्या अंमलात असलेल्या प्रचलित नियमांनुसार/आदेशानुसार असतील.