ऑनलाइन वृत्तसेवामुंबई

शासनाची नवी नियमावली जाहीर:रात्री 11 ते सकाळी 5 नाईट कर्फ्यु

15 फेब्रुवारीपर्यंत शाळा,कॉलेज बंद

मुंबई – देशात करोनाची तिसरी लाट सुरु झाली आहे. देशासह महाराष्ट्रातही करोनाच्या दैनंदिन नवीन रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आज नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 10 जानेवरीच्या मध्यरात्रीपासून हे नियम लागू होणार असून 15 फेब्रुवारीपर्यंत नियम लागू असतील.

या नवीन नियामानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, करोनाचे दूत बूनन इतरांचे आरोग्य धोक्यात घालू नका. रोजीरोटी बंद करायची नाही पण आरोग्याचे नियम पाळण्यात हलगर्जी नको, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच निर्बंध धुडकावणाऱ्यावर कठोर कारवाई करा, असे निर्देशही प्रशासनाला दिले आहेत.

असे असतील नवीन नियम –

-सलून, खासगी कार्यालये, थिएटर क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
-सार्वजनिक वाहतूकीत दोन्ही दडोस घेतलेल्यांनाच परवानगी.
-शाळा, काॅलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद
-हाॅटेल, रेस्टाॅरंट 50 टक्के क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंतच सुरु राहतील,
-स्विमींग पूल, स्पा, जिम पूर्णपणे बंद
-मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे पूर्णत: बंद
-रात्री 11 ते सकाळी पाच वाजेवर्यंत असणार नाईट कर्फ्यू. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित फिरू शकणार नाहीत.
-लग्न समारंभासाठी 50, अंत्यसंस्कारासाठी 20 व्यक्ती, कार्यक्रमांसाठी 50 लोकच उपस्थित असतील.
-शाळा, खासगी क्लासेस ऑनलाइन पद्धतीने सुरु राहतील.
-शाॅपिंग माॅल रात्री 10 ते 8 वाजेपर्यंत बंद असतील.
-मालवाहतूकीवर कोणतीही बंधने नाहीत.
-लोकल वाहतूकीवर कोणतेही निर्बंध नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *