बीड

बीड जिल्ह्यात आज 12 कोरोना बाधित:राज्यात 26538 तर देशात 90928 रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 6 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2157 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 12 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2145 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात आष्टी 2 बीड 5 गेवराई 1 परळी 3 पाटोदा 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात 26,538 नवे करोनाबाधित

मुंबई – राज्यात काल दिवसभरात तब्बल 26 हजार 538 नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या ऍक्‍टिव्ह करोनाबाधिताचा आकडा आता 87 हजार 505वर पोहोचला आहे. त्यासोबतच राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण बाधितांचा आकडा देखील तब्बल 797वर गेल्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात वाढ झालेल्या बाधितांमुळे आजपर्यंत राज्यात आढळलेल्या एकूण बाधितांचा आकडा 67 लाख 57 हजार 032 इतका झाला आहे. त्यापैकी 87 हजार 505 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत.

आज दिवसभरात राज्यातील एकूण 5 हजार 331 बाधित करोना निगेटिव्ह होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 96.55 टक्के इतका असल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात 8 करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा एकूण मृत्यूदर 2.09 टक्‍क्‍यांवर आला आहे.

चिंताजनक:देशात २४ तासांत नवे ९०,९२८ रुग्ण

देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून गेल्या २४ तासांत नवे ९०,९२८ रुग्ण आढळून आले आहेत. तर ३२५ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनातून १९,२०६ रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाचा रोजचा पॉझिटिव्हिटी दर ६.४३ टक्के इतका झाला आहे. सध्या देशात २ लाख ८५ हजार ४०१ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या २,६३० वर पोहोचली आहे. यातील ९९५ रुग्ण ओमायक्रॉनमधून बरे झाले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक ७९७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर दिल्लीत आतापर्यंत ४६५ रुग्णांची नोंद झाली आहे.

देशात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ नोंदवण्यात येत आहे. बुधवारी दिवसभरात रूग्णसंख्येत ५६ टक्क्यांची भयावह वाढ नोंदवण्यात आली.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *