सरकारी कार्यालयात 50 टक्के इतकीच कर्मचाऱ्यांची उपस्थिती:केंद्राची नवी नियमावली जारी
देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरियंटच्या संसर्गाचं प्रमाणही वाढलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.
सरकारी कार्यालयात 50 टक्के इतकीच कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यात यावी, उर्वरित कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात यावे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाचे वेळापत्रक ठरवून देऊन फक्त 50 टक्के उपस्थिती ठेवावी. जे कर्मचारी कंटेमेंट झोनमध्ये राहतात, त्यांना कार्यलयात बोलवू नका. दिव्यांग, अपंग कर्मचाऱ्यांनाही कार्यलयात बोलविण्यात येऊ नये. गर्भकती महिलांनाही सूट देण्यात यावी, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
20 टक्के रहिवासी बाधित आढळल्यास इमारत सील
इमारतीतील एकूण रहिवाशांपैकी 20 टक्के रहिवासी कोरोनाबाधित आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाईल, असे आदेश मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.