मोठी दिलासादायक बातमी:बीड जिल्हा आज कोरोनामुक्त
बीड जिल्ह्यात आज दि 26 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1049 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 0 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1049 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात आज 0 रुग्ण संख्या आहे
बीड जिल्ह्यात कोरोनाने रुग्ण कमी संख्येने आढळत होते ,तालुक्यात एक दोन रुग्णाचे प्रमाण होते,त्यामुळे जिल्ह्यासाठी मोठा दिलासा मानला जात होता,तपासणीचे प्रमाण बघता रुग्ण संख्या ही फारसी नव्ह्ती त्यामुळे बीड जिल्हा कोरोना मुक्त होऊ शकतो असे वाटत असताना आज दिलासादायक बातमी आली आहे
राज्यात चिंता वाढली:कोरोना रुग्णवाढ आणि ओमीक्रोनचे 2 रुग्ण
मुंबई: राज्यात आज शनिवारी ओमिक्रॉनचे (Omicron) २ नवे रुग्ण आढळले असून एकूण आमिक्रॉन रुग्णांची संख्या ११० वर पोहोचली आहे. या पैकी ५७ रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत. मात्र, दुसरीकडे अधिक चिंता ही करोनाने वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाली असल्याने काहीशी चिंताजनक स्थिती आहे. राज्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ७९६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज १ हजार ४८५ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर, राज्यात आज ९ हजार १०२ रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरू आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण ६५ लाख ०२ हजार ०३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६८ टक्के झाले आहे.