३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षांच्या मुलांचे लसीकरण-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
नवी दिल्ली: ओमिक्रॉन व्हेरिएंटचं संकट गडद होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत.
भाषणातील मुद्दे
साठ वर्षांवरील सहव्याधीग्रस्त व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिसरा डोस देणार. त्याची सुरुवातही १० जानेवारीपासून.
- आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देणार. १० जानेवारीपासून तिसरा डोस.
- पंधरा ते अठरा वर्षांच्या मुलांसाठी लसीकरण सुरू करणार. ३ जानेवारीपासून लसीकरण.
- ओमिक्रॉनला घाबरण्याचे कारण नाही. केवळ सतर्क राहा आणि कोविड नियम पाळा असे आवाहन त्यांनी केले आहे
सध्या सुरु असलेल्या नाताळ आणि वर्षअखेर या काळातही कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. जगभरात ओमायक्रोनचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे मास्कचा जास्तीत जास्त वापर करा, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. त्याचसोबत नरेंद्र मोदी यांनी आज तीन महत्वाच्या घोषणा देखील केल्या आहेत.
३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोघटातील मुलाचं लसीकरण सुरु होणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच १० जानेवारी २०२२ पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जाणार असल्याचं देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे १० जानेवारीपासून ६० वर्षांवरील नागरिकांनाही बूस्टर डोस दिला जाऊ शकतो, पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.