त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर;एसटी विलीनीकरणावरील सुनावणी उद्या 22 रोजी
मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत त्रिसदस्यीय समितीने आपला प्राथमिक अहवाल न्यायालयात सादर केला. यानंतर न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेत 22 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय समितीसमोर ही सुनावणी झाली. या अहवालात एसटीचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या विषयावर भूमिका मांडण्यात आली. विलीनीकरणाचा मुद्दा हा थोडा अवघड आहे. त्याला वेळ लागेल, असे अहवालात नमूद करण्यात आले होते.
तसेच सरकारकडून पगारवाढ करण्यात आल्याचाही मुद्दा मांडण्यात आला. हा अहवाल कोर्टात वाचण्यात आला. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तीवाद केला. यावेळी न्यायालयाने सदावर्ते यांना कर्मचाऱ्यांना सध्या कामावर रुजू करण्याचे आवाहन करण्याची सूचना दिली.