बीडकरांसाठी सुखद दिलासा दोन रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
बीड
जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना बाधितांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत यापैकी दोन रुग्ण ठणठणीत बरे झाले असून बीड जिल्ह्यासाठी ही आनंदाची बाब आहे हा सुखद दिलासा मिळाल्यामुळे कोरोना ला न घाबरता प्रत्येकाने आता सावध राहून याचा मुकाबला करायला हवा आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे दोन रुग्णांना आज जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे विशेष म्हणजे केक कापून वाजतगाजत त्यांना आपल्या घरी पाठवण्यात आले
गेवराई तालुक्यातील इटकर येथील १४ वर्षीय मुलगी व माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील इसम गेल्या दहाबारा दिवसापासून बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते . रोज जिल्हात रुग्ण वाढत असताना आज मात्र दोन कोरोना बाधित रुग्ण बरे झाले तेव्हा आरोग्य प्रशासनाने आज या दोघांच्या हाताने केक कापून पोलीस बँडपथका च्या सलामी तुन त्यांना घरी पाठवले या वेळी जिल्हारुग्नालय प्रमुख डॉ अशोक थोरात ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पवार डॉ सुखदेव राठोड ,डॉ जयश्री बांगर यांच्या सह आदी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
बीड जिल्हयातील आज एकूण 46 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
कॉविड 19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वब आज सकाळी 6.45 वाजता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन लातूर येथे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.
1) जिल्हा सामान्य रुग्णालय 20
2) स्वाा. रा. ती. ग्रा. वै .म. अंबाजोगाई 00
3) उपजिल्हा रुग्णालय केज 09
4) ग्रामीण रुग्णालय, आष्टी 02
5) ग्रामीण रुग्णालय, माजलगाव 05
6) उपजिल्हा रुग्णालय, गेवराई 03
7) उपजिल्हारुग्णालय, परळी 07