बीड

बीड जिल्ह्यात आज 13 पॉझिटिव्ह:राज्यात 664 तर देशात 8603 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 4 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 988 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 13 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 975 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 5 गेवराई 2 केज 1 माजलगाव 1 परळी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात आज 664 नवीन कोरोनाबाधित

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. राज्यात आज 664 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे.

तर 915 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत 64 लाख 85 हजार 335 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.71 टक्के इतके झाले आहे.राज्यात आज 16 रुग्णांच्या मृत्यूची (Death) नोंद झाली आहे.

आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 049 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.12 टक्के असून हा दर मागील अनेक दिवसांपासून स्थिर आहे. सध्या राज्यात 7 हजार 132 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (Active Patient) असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भारतात 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

कोरोनाबाधितांच्या (coronavirus) संख्येत सध्या घट झालेली पाहायला मिळत आहे. जगाची धाकधूक वाढवणाऱ्या ओमायक्रॉनचा अखेर भारतात शिरकाव झाला आहे.
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव (Coronavirus) सुरुच आहे. देशात गेल्या 24 तासांत 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच 415 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील सद्यस्थिती…

आतापर्यंत 4 लाख 70 हजार 530 जणांचा मृत्यू झाला आहे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 99 हजार 974 झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 70 हजार 530 झाली आहे. रिपर्टनुसार, आतापर्यंत 3 कोटी 40 लाख 53 हजार 856 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *