पहिली ते सातवी चे वर्ग सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई : 1 डिसेंबर पासून राज्यभरातील पहिली सातवीच्या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग कडून जिल्हापरिषद महापालिका स्तरावर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी त्यासोबत जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत
इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा राज्यभरात 1 डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतल्यानंतर आता आरोग्य विभागाकडून याबाबत मार्गदर्शक सूचना शाळांसाठी काढण्यात आल्या आहेत. या सूचनांचे काटेकोरपणे पालन राज्यातील सर्व शाळांनी करायचे आहे. यानंतर शिक्षण विभाग या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून शिक्षण अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत शासन निर्णय जारी करेल.
दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतोवर किमान सहा फूट अंतर ठेवावे.
शाळेमध्ये प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे.
वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिचा अवलंब करू नये.
शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात.
ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती असावी.
मुले किंवा शिक्षक आजारी असतील तर त्यांनी शाळेत येऊ नये, आवश्यक नियमांचे पालन करावे.
क्वारंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी.
शाळेतील एकाच वर्गातील पाचपेक्षा अधिक मुले दोन आठवड्याच्या कालावधीत कोरोना बाधित आढळल्यास शाळेतील कोव्हीड प्रतिबंधक कृती योजनेचा सखोल आढावा घ्यावा.
शाळांनी वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे.
शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यावर अथवा मोकळ्या वेळेत मुलांनी एकत्र येऊन नियमांचा भंग करू नये.