बीड

लस नाही तर प्रवेश नाही:जिल्ह्यात कडक निरबंध:मार्गदर्शक सुचना जारी

१. जिल्हयातील सर्व शासकिय / निमशासकिय कार्यालये व खाजगी आस्थाननांमध्ये कार्यरत अधिकारी /कर्मचारी यांच्या कोविड -१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख / आस्थापना प्रमुख यांनी करावी.कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबधित /अधिकारी /कर्मचारी यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावे. ज्या कर्मचा-यांचे लसीकरणासाठी काही अडचणी असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात जावे किंवा लसीकरणांचे विषेश सत्र आयोजीत करावे. जेणेकरुन सर्व अधिकारी / कर्मचारी याचं लसीकरण पुर्ण होईल. याची खातरजमा
करावी

२. ज्या गावात /वार्डात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक. जिल्हा आरोग्यअधिकारी व तालुका वै_किय अधिकारी , नगरपालिका व नगरपचायंत यांनी विशेष मोहिम राबवुन जास्तीत
जास्त नागरिकांचे लसीकरण करावे. व लसीकरणाचे उदिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करुन त्या दृष्टीने कार्यवाही करावी .
३. सर्व प्रकारचे दुकाने / आस्थानांतील हॉटेल व कामगार / कर्मचारी यांच्या लसीकरणाची किमान १ मात्रा Dose पूर्ण झालेल्या असतील तीच दुकाने / आस्थापना यापूढे खुली करण्यास मुभा राहील .
४, जिल्हयातील सर्व शासकिय / निमशासकिय कार्यालये / अनुदानित संस्था / विनाअनुदानीत संस्था व खाजगी आस्थापनामध्ये कामकाजास्तव येणा-या सर्व अभ्यागतांना लसीकरणाची किमान मात्रा झालेली नसल्यास त्यांना कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. या बाबत No vaccine no entry हा नियम अत्यंत काटेकोरपणे पाळला जाईली यांची सर्वानी नोंद घ्यावी .
५. विविध मागण्यां बाबत शासकिय कार्यालयात येणा-या शिष्टमंडळातील सदस्यांनाही कोविड -१९ चा प्रथमडोस अनिवार्य : डोस घेतल्याची खात्री केल्यानंतरच प्रवेश मिळेल.
६. जिल्हयातील सर्व शासकिय व निमशासकिय कार्यालयातुन कोणतेही शासकिय प्रमाणपत्र/ दाखला निर्गमीत करण्यापुर्वी अर्जदाराने लसीकरणांचा किमान ०१ मात्रा पूर्ण झाले असल्या बाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडलेले असावे. या बाबत सर्व कार्यालय प्रमुखांनी लसीकरणा बाबतची खात्री करुनच प्रमाणपत्र
दाखला व निर्गमीत करण्याची कार्यवाही करावी.
७. सर्व शैक्षणिक संस्था प्रशिक्षण केंद्र शिकवणी / क्लासेस इ.तस्सम संस्थामध्ये लसीकरणाची किमान ०१ मात्रा पूर्ण झालेल्या विदयार्थी प्रशिणार्थी कर्मचारी व अभ्यागतांनाच संस्थेच्या इमारतीरच्या अथवा आवारात प्रवेश राहील या बाबतच्या सर्व सूचनांचे पालन करुन सर्व कोविड -१९ प्रतिबंधात्मक बाबीचे
संबधी सर्वस्वी जवाबदारी संबधित प्राचार्य / मुख्याध्यापक संस्था प्रमुख यांची असेल . यांचे उल्लघन निदर्शनास आल्यास अशा संस्था सदर बाबीच्या पुर्वतेपर्यत Seal करण्यांत येतील .
८ . सर्व धार्मिक स्थळे , प्रार्थना स्थळे यांच्या प्रवेशद्वारावरच लसीकरणाची किमान ०१ मात्रा झाली असलेल्या भाविकांनाच प्रवेश दिला जाईल याची सर्वस्वी जवाबदारी संबधित धार्मिक व्यवस्थापनाची राहील.
९. सर्व शासकिय /अशासकिय आस्थापनांवर कार्यरत अधिकारी / कर्मचारी ज्याची लसीकरणाची किमान ०१ मात्रा पुर्ण झालेली आहे. अश्या अधिकारी / कर्मचारी यांनी लसीकरणांचे प्रमाणपत्र सादर
केल्यानंतरच संबधिताचे डिंसेबर २०२१ चे वेतन अदा करण्यांत यावे
१०. No vaccine no travel in bus यानुसार आंतरजिल्हा व आंतरराज्य बसने / खाजगी प्रवासी वाहनाने प्रवासी वाहनाने प्रवास करण्यासाठी देखील लसीकरणाची किमान ०१ मात्रा पुर्ण झालेली असणे बंधनकारक राहील.

विशेष सुचना
१. लोकजार्गतीतुन लसीकरण मोहिम राबविण्यावर भर देण्यात यावा .लसीकरणास पात्र लाभार्थी १०० /.
लसीकरण प्रथम मात्रा First Dose झाले पाहिले लसीकणाचा दुसरा डोस (Covishield ८४ दिवस व Covaxin २८ दिवसानी घेणे अनिवार्य आहे . Covid Appropriate behavior (CAB ) उल्लंघन करणा-यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल .
सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती संस्था किंवा संघटणा यांनी अंमलबजावणी करण्यांत
टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ वे
कलम ५१ ते ६० व भारतील दंड संहिता १८६० चे कलम १८८ तसेच साथरोग १८९७ अन्वये
दंडनीय / कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील.असे आदेश राधाबिन अ.शर्मा
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,बीड यांनी दिले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *