देशनवी दिल्ली

महागाईमध्ये वाढ सर्वसामान्यांसाठी मोठा फटका:दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती ८ ते १० टक्क्यांनी वाढणार

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांमध्ये इंधनाच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर झाला असून माल वाहतुकीचा खर्च वाढला आहे. या सर्वात महागाईमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे आता दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंच्या किमती ८ ते १० टक्क्यांनी वाढणार असून हा सर्वसामान्यांसाठी मोठा फटका मानला जात आहे.

कपडे, टीव्ही, फ्रिज, साैंदर्य प्रसाधने तसेच इतर इलेक्ट्राॅनिक्स वस्तू या अशा दैनंदिन वापराच्या वस्तूंचा यात समावेश आहे. किरणा, पॅकबंद खाद्यपदार्थ, पर्सनल केअर उत्पादने यासारख्या वस्तुंच्या किमती यापूर्वीच वाढलेल्या आहेत.

इंधन दरवाढीचाही यावर परिणाम झाला. सप्टेंबरमध्ये इंधन आणि उर्जा विषयक महागाई २४.८ टक्के हाेती. त्यातच लाॅजिस्टिक आणि वेअर हाउसिंगचाही खर्च वाढला आहे. मालवाहतुकीचे भाडे उच्चांकी पातळीवर हाेते. त्यामुळे किंमती वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

काच, कापूस, स्टील, इलेक्ट्राॅनिक चिप तसेच आवश्यक रासायनिक कच्चा माल अतिशय महाग झाला आहे. सुती धाग्याच्या किंमती गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे कापड उद्याेगाला माेठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे.

गेल्या सहा महिन्यांमध्ये घाऊक महागाईचा दर वाढलेला आहे. किरकाेळ महागाई कमी झालेली आहे. तरीही थाेक महागाईमुळे किमतीत वाढ करण्यात येणार आहे. कंपन्यांच्या वाढलेल्या उत्पादन खर्चाचा अंदाज थाेक महागाईवरून येताे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *