बीड जिल्ह्यात आज 12 पॉझिटिव्ह:राज्यात 1094 तर देशात 11466 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 11 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 920 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 12 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 908 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 2 बीड 2 धारूर 1 गेवराई 1 केज 1 पाटोदा 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात १ हजार ०९४ नव्या रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यात काल करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत किचिंत वाढ झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र वाढली असली तरी, मृत्यूसंख्याही घटल्याने राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात राज्यात १ हजार ०९४ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या ९८२ इतकी होती. तर कालच दिवसभरात एकूण १ हजार ९७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ही संख्या १ हजार २९३ इतकी होती. तर, कालही १७ रुग्णांचा मृत्यू झाला. (maharashtra registered 1094 new cases in a day with 1976 patients recovered and 17 deaths today)
काल राज्यात झालेल्या १७ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ६३ हजार ९३२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ टक्के इतके आहे.
देशात गेल्या 24 तासांत 11466 नवे रुग्ण
देशात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या 24 तासांत 11466 नवे रुग्ण आढळले, तर 460 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट एक टक्क्यांखाली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी दर) 98.25 टक्क्यांवर गेला आहे.
कोरोना लसीकरण मोहिमेला जनतेचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे देशभरात संसर्ग आटोक्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत पेंद्रीय आरोग्यमंत्रालयाने गेल्या 24 तासांतील आकडेवारी जाहीर केली.
24 तासांत बुधवारी सकाळी आठपर्यंत 11466 नवे रुग्ण आढळले. 20 हजारांपेक्षा कमी रुग्णसंख्या आढळण्याचा हा सलग 33वा दिवस आहे. ऑक्टिव्ह रुग्णसंख्या 1 लाख 39 हजारांवर आहे. 264 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशात 46 दिवसांपासून पॉझिटिव्हिटी रेट 2 टक्क्यांपेक्षा कमी आहे. मृत्यूदर 1.34 टक्के आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)