बीड

प्रचंड प्रतिसाद देऊन बीडकरांनी स्वीकारल्या क्षीरसागर बंधूंच्या शुभेच्छा


25 हजार निमंत्रितांच्या उपस्थितीत क्षीरसागर बंधूंचे दीपावली स्नेहभोजन


बीड दि.07(प्रतिनिधी)ः- कोरोनाच्या संसर्ग परिस्थितीत दोन वर्षांपासून भेटी गाठी होऊ शकल्या नाहीत, आता कोरोना उतरतीला लागला तरी ही सर्व अटी नियमांचे पालन करत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर आणि युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बीड मधील के.एस.के. महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणावर दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तब्बल 25 हजार कार्यकर्ते, स्नेही, हितचिंतक जिल्हाभरातून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, रोहित क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहिले होते.

विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या कार्यक्रमात नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले, तर महिलांसाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. सौ.प्रतिभाताई क्षीरसागर, प्राचार्या डॉ.दिपाताई क्षीरसागर, पुष्पाताई पांगारकर, प्रियाताई महींन्द्रे, डॉ.सारिका क्षीरसागर, पूजा क्षीरसागर(धोटे) यांनी येणार्‍या प्रत्येक महिला भगिनींचे स्वागत करून आदरातिथ्य केले.

कोरोना महामारीने गेल्या दोन वर्षात कुठलाच सार्वजनिक कार्यक्रम करता आला नाही, आता थोडा दिलासा देणारी स्थिती लक्षात घेऊन सर्व नियमांचे पालन करून दीपावली स्नेहमीलन आणि स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर, रामकृष्ण रंधवे महाराज, लक्ष्मण महाराज मेंगडे, ज्ञानेश्‍वर महाराज मंझेरीकर, वसंत महाराज लोळदगाव, उध्दव महाराज चोले खडकी, नवनाथ महाराज गोरक्षनाथ टेकडी, नाना महाराज कदम, नवनाथ महाराज अंथरवन पिंप्री, आ.सुरेश धस, गेवराईचे आ.लक्ष्मण पवार, माजी आ.बदामराव पंडित, फुलचंद कराड, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, आप्पासाहेब जाधव, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाबरी मुंडे, संतोष हंगे, राणा डोईफोडे, सहाल चाऊस, सरपंच भारत जवळकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड.संगीताताई चव्हाण, उषाताई सरवदे, नितीन धांडे, परमेश्वर सातपुते, गोरख शिंगण, सुनिल सुरवसे, जयसिंग चुंगडे, रतन गुजर, सुशिल पिंगळे, विजयकांत मुंडे, बबन सरवदे, सतीष दुग्गड, दयानंद तोष्णीवाल यांच्यासह क्षीरसागर बंधूंवर प्रेम करणारे बीड शहरातील आणि मतदार संघातील सरपंच, उपसरपंच तसेच असंख्य कार्यकर्ते, नागरिक, प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार, उद्योजक, व्यापारी, सर्व संघटनेचे पदाधिकारी, नगरसेवक विष्णू वाघमारे, भास्कर जाधव, मुखींदलाला, एकबाल भाई इनामदार, शेख इलियास, जगदीश गुरुखुदे, अ‍ॅड.विकास जोगदंड, सुशीला नाईकवाडे, पूजा वाघमारे, विनोद मुळूक, रवींद्र कदम, सादिकजमा, युनूस मुजीब, जे.के. पठाण, रंजित बनसोडे, किशोर पिंगळे, भारती क्षीरसागर, जमील भाई नसिर अन्सारी, राम वाघ, सुमंत रुईकर, अशोक दरक उपस्थित होते.

आलेल्या प्रत्येकाचे स्वागत केले जात होते तर आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग दिसून आली, तर सर्वांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. प्रा.जगदीश काळे, अरुण डाके, विलास बडगे, दिनकर कदम, नानासाहेब काकडे, गणपत डोईफोडे, अरुण बोगाणे आदींनी देखील येणार्‍यांचे स्वागत केले. दुपारी 1 ते सायंकाळी 5 या वेळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *