आणखी 6 पॉजिटीव्ह बीडच्या रुग्ण संख्येत वाढ
बीड
जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून आज पुन्हा आणखी 6 रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत आज सकाळीच 2 रुग्ण पॉजिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे ही साखळी तुटेल अशी आशा होती पण ही संख्या वाढतच चालली आहे
आता जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 47 तर एकूण रुग्ण संख्या ५५ झाली आहे . मंगळवारी बीड जिल्हयातुन 28 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते यातील 6 नमुने पॉझिटिव्ह आले , तर 22 नमुने निगेटिव्ह आहेत .
आज दुपारी रिपोर्ट आलेले दोन्ही बाधित हे बीड शहरातील दिलीपनगर ( पंचशील नगरच्या बाजुस ) भागातील आहेत . ते मुंबईच्या नरसीपाडा भागातून दोन दिवसांपूर्वी शहरात आले होते . लक्षणं जाणवू लागल्यानंतर ते जिल्हा रूग्णालयात भरती झाले . एकूण 3 जणांचं हे कुटुंब होते . यात 36 वर्षीय पुरुष तर 12 वर्षीय मुलगी बाधित झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली . त्याच कुटुंबातील महिलेच्या स्वॅबचा मात्र निष्कर्ष निघालेला नाही . त्यामुळे उद्या पुन्हा त्या महिलेचा स्वब घेतला जाण्याची शक्यता आहे . कालच्या प्रलंबीत 7 मधील 5 अहवालाबाबत कुठलाही निष्कर्ष निघालेला नाही बीडकरांनी आता याचे गांभीर्य लक्षात घेऊन गर्दीच्या ठिकाणी अंतर ठेवूनच व्यवहार करावा तसेच आवश्यक असेल तरच घरा बाहेर पडावे प्रशासन सूचना देण्याचे काम करत असले तरी त्याची अंमलबजावणी करणे हे आपल्या हाती आहे संचारबंदी मध्ये शिथिलता दिली म्हणून गर्दी करून कोरोनाला आमंत्रण देऊ नये
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या–55
बीड जिल्हयातील आज एकूण ३० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले सदर अहवाल प्राप्त झाले आहेत.
पाॅझिटीव्ह अहवाल–06
निगेटीव्ह अहवाल–22
प्रलंबित अहवाल–02Inconclusive अहवाल–00
आज आढळलेले रुग्ण पुढील गावातील आहेत
हाळंब तालुका परळी–2
बारगजवाडी तालुका शिरूर–2
कारेगाव तालुका पाटोदा–1वाहली तालुका पाटोदा –1