बीड जिल्ह्यात आज फक्त 6 पॉझिटिव्ह तर 114 सक्रिय रुग्ण:राज्यात 1078 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज फक्त 6 पॉझिटिव्ह तर 114 सक्रिय रुग्ण:राज्यात 1078 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 3 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 665 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 6 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 659 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 3 गेवराई 2 केज 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात फक्त 114 रुग्ण ऍक्टिव्ह
काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 11 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 114 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3300 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 368 रुग्ण बरे झाले आहेत,काल जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 1.37% आहे तर डेथ रेट 2.71%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2808 जणांचा बळी गेला आहे,जिल्ह्याचा एकूण रिकव्हरी रेट 97,17%इतका पोहचला आहे,81 कोविड सेंटर मध्ये 3178 पैकी 3038 बेड शिल्लक आहेत
राज्यात 1,078 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात आज 1,078 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 095 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 53 हजार 581 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.59 टक्के आहे. राज्यात सध्या 15 हजार 485 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,91,497 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 919 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 28 , 43, 792 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
देशभरात 11903 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 903 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 51 हजार 209 वर पोहोचली आहे.
देशात आतापर्यंत 3 कोटी 36 लाख 97 हजार 740 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
दिवसभरात 311 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकड्यात वाढ झाली असून देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 4 लाख 59 हजार 191 वर पोहोचला आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)