बीड जिल्ह्यात आज फक्त 3 पॉझिटिव्ह तर 120 सक्रिय रुग्ण:राज्यात 1172 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 1 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 198 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 3 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 195 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 2 धारूर 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात फक्त 120 रुग्ण ऍक्टिव्ह
काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 10 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 120 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3288 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 0361 रुग्ण बरे झाले आहेत,काल जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 1.1% आहे तर डेथ रेट 2.71%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2807 जणांचा बळी गेला आहे,जिल्ह्याचा एकूण रिकव्हरी रेट 97,16%इतका पोहचला आहे,81 कोविड सेंटर मध्ये 3178 पैकी 3041 बेड शिल्लक आहेत
राज्यात १ हजार १७२ नवीन कोरोनाबाधित
राज्यात रविवारी १ हजार १७२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. १ हजार ३९९ जण कोरोनामुक्त झाले असून, आज २० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
राज्यात आज रोजी एकूण १६,६५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. १ हजार ३९९ जण कोरोनामुक्त झाले असून, आजपर्यंत एकूण ६४,५०,५८५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.५७% एवढे झाले आहे.१ हजार १७२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,११,०७८ झाली आहे. राज्यात आज २० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, आजपर्यंत १४०२१६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)