बीड जिल्ह्यात आज 8 पॉझिटिव्ह तर 128 सक्रिय रुग्ण:राज्यात 1338 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 30 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1018 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 8 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1010 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 3 गेवराई 1 माजलगाव 2 पाटोदा 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात फक्त 128 रुग्ण ऍक्टिव्ह
काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 11 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 128 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3269 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 0336 रुग्ण बरे झाले आहेत,काल जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 0.8 % आहे तर डेथ रेट 2.71%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2800 जणांचा बळी गेला आहे,जिल्ह्याचा एकूण रिकव्हरी रेट 97,15 %इतका पोहचला आहे,81 कोविड सेंटर मध्ये 3039 बेड शिल्लक आहेत
राज्यात १ हजार ३३८ नव्या रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यात आज करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. तसेच दैनंदिन मृत्यूसंख्या मात्र कालइतकीच आहे. तर, आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत मात्र आज घटली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात १ हजार ३३८ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
दिवसभरात एकूण १ हजार ५८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
काल राज्यात झालेल्या ३६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ४७ हजार ०३८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५५ टक्के इतके आहे.
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजार ४६५ इतकी आहे.
काल दिवसभरात देशात १४,३१३ नवीन कोरोनाबाधितांची नोंद
नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतील चढ-उतार सुरूच असून शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत थोड्या प्रमाणात घट झाली आहे. काल दिवसभरात देशात १४,३१३ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे.
काल दिवसभरात देशात ५४९ करोनाबाधितांचा मृत्यु झाला आहे.
आरोग्य मंत्रालय नुकत्याच जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात शुक्रवारी १४,३१३ कोरोनाबाधिताची नोंद झाली आहे. तर ५४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात १३,५४३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सध्या देशात एक लाख,६१ हजार,५५५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.
त्यानंतर देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या ३,३६,४१,१७५ झाली आहे
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)