बीड जिल्ह्यात आज 10 पॉझिटिव्ह तर 132 सक्रिय रुग्ण:राज्यात 1485
बीड जिल्ह्यात आज दि 28 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1358 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 10 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1348 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात आष्टी 3 बीड 1 माजलगाव 5 केज 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात फक्त 132 रुग्ण ऍक्टिव्ह
काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 15 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 132 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3251 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 0317 रुग्ण बरे झाले आहेत,काल जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 1.0% आहे तर डेथ रेट 2.71%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2800 जणांचा बळी गेला आहे,जिल्ह्याचा एकूण रिकव्हरी रेट 97,15 %इतका पोहचला आहे,81 कोविड सेंटर मध्ये 3023 बेड शिल्लक आहेत
राज्यात 1485 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1485 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 536 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
राज्यात आतापर्यंत 64 लाख 43 हजार 342 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.53 टक्के आहे.
राज्यात आज 38 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
राज्यात सध्या 19 हजार 480 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
देशात गेल्या 24 तासांत 13451 नवे कोरोनाबाधित
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. परंतु, मृतांचा आकडा मात्र फारसा घटलेला नाही. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 13 हजार 451 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच काल दिवसभरात 585 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 4 लाख 55 हजार 653 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 14 हजार 21 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या एकूण एक लाख 62 हजार 661 रुग्णं कोरोनाबाधित आहेत. तर देशात आतापर्यंत कोरोनाच्या 3 कोटी 42 लाख 15 हजार 653 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 3 कोटी 35 लाख 97 हजार 339 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)