बीड जिल्ह्यात आज 22 पॉझिटिव्ह तर 151 सक्रिय रुग्ण:राज्यात 1825 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 21 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1269 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 22 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1247 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 3 बीड 1 धारूर 1 आष्टी 5 गेवराई 4 माजलगाव 2 परळी 1 पाटोदा 4 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात फक्त 151 रुग्ण ऍक्टिव्ह
काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 15 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 151 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3157 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 207 रुग्ण बरे झाले आहेत,काल जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 0.06% आहे तर डेथ रेट 2.71%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2799 जणांचा बळी गेला आहे,जिल्ह्याचा एकूण रिकव्हरी रेट 97,14%इतका पोहचला आहे,81 कोविड सेंटर मध्ये 2981 बेड शिल्लक आहेत
राज्यात काल 1825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात काल 1825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यात काल एकूण 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक 4 मृत्यू हे सातारा जिल्ह्यात झाले असल्याची नोंद आहे.
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल 1825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 2 हजार 879 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 27 हजार 426 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.43 टक्के आहे. राज्यात काल 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 7537 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात सध्या 25 हजार 728 रुग्णांवर उपचार सुरु आहेत
भारतात कोरोना रुग्णांमध्ये होतेय घट
भारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसची 14,623 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. 19,446 बरे झाले आणि 197 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत भारतात कोरोनाची 3,41,08,996 प्रकरणे समोर आली आहेत. तर अॅक्टिव्ह प्रकरणे 1,78,098 आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत भारतात 4.52 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे की, अॅक्टिव्ह प्रकरणे अडीच लाखांवर आली आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)