बीड जिल्ह्यात आज फक्त 6 पॉझिटिव्ह तर 162 सक्रिय रुग्ण:राज्यात 1638 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 20 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 985 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 6 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 971 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 1आष्टी 2 माजलगाव 3 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात फक्त 162 रुग्ण ऍक्टिव्ह
काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 17 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 162 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3151 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 1092 रुग्ण बरे झाले आहेत,जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 1.00% आहे तर डेथ रेट 2.21%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2797 जणांचा बळी गेला आहे,जिल्ह्याचा एकूण रिकव्हरी रेट 97,04%इतका पोहचला आहे,81 कोविड सेंटर मध्ये 2982 बेड शिल्लक आहेत
राज्यात १ हजार ६३८ नवीन रुग्णांचे निदान.
मुंबई: राज्यातील कोविड स्थिती नियंत्रणात आली असून दैनंदिन रुग्णसंख्या आता दीड हजारापर्यंत खाली घसरली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून १ हजार ६३८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर २ हजार ७९१ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९७.४२ टक्के एवढे आहे तर मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
राज्यात कोविडची दुसरी लाट ओसरत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे दैनंदिन मृत्यूंचे प्रमाणही कमी झाले आहे. ही स्थिती लक्षात घेत राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथील करण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसारच रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत तर दुकाने व इतर आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दिवाळी आधी हे सकारात्मक चित्र दिसत असतानाच आजची आकडेवारी हाती आली असून त्यात नवीन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिकच राहिली आहे. राज्यात आणखी ४९ रुग्ण आज करोनाने दगावले असून मुंबईत चार मृत्यू झाले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता २६ हजारपर्यंत खाली आली आहे.
करोनाची राज्यातील स्थिती
- आज ४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ % एवढा आहे.
- दिवसभरात १ हजार ६३८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २ हजार ७९१ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
- आजपर्यंत एकूण ६४,२४,५४७ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४२% एवढे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)