बीड

बीड जिल्ह्यात आजही दिलासा, 10 पॉझिटिव्ह तर 169 सक्रिय रुग्ण:राज्यात 1715 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 18 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1040 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 10 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1030 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात आष्टी 4 गेवराई 2 माजलगाव 2,परळी 1 पाटोदा 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात फक्त 169 रुग्ण ऍक्टिव्ह

काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 23 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 169 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3114 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 151रुग्ण बरे झाले आहेत,जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 0.80% आहे तर डेथ रेट 2.70%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2794 जणांचा बळी गेला आहे,जिल्ह्याचा एकूण रिकव्हरी रेट 97,12%इतका पोहचला आहे,81 कोविड सेंटर मध्ये 2963 बेड शिल्लक आहेत

राज्यात १ हजार ७१५ नवीन रुग्णांचं निदान

मागील काही महिन्यांपासून राज्यात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. राज्यात आज पुन्हा एकदा २ हजारांपेक्षा कमी नव्या करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात आज १ हजार ७१५ नवीन रुग्णांचं निदान झालं. आज २ हजार ६८० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण ६४,१९,६७८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३९ टक्के एवढं झालं आहे.
रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरीही राज्यात अजूनही काही रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. राज्यात आज २९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *