बीड जिल्ह्यात आज 22 पॉझिटिव्ह:राज्यात 2294 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 11 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1138 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 22 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1116 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात आष्टी 5 बीड 8 धारूर 1 केज 1 माजलगाव 2 पाटोदा 1 शिरूर 3 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात २ हजार २९४ नवीन करोनाबाधित
राज्यात पुन्हा एकदा दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांची संख्याही आज करोनामधून बरे झालेल्यांच्या तुलनेत अधिक आढळून आली आहे. काल दिवसभरात राज्यात २ हजार २९४ नवीन करोनाबाधित आढळले असून, १ हजार ८२३ जण करोनामुक्त झाले आहेत.
याशिवाय, २८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६४,०१,२८७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.३२ टक्के एवढे झाले आहे.
आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,७७,८७२ झाली आहे. तर, राज्यात आपर्यंत १३९५४२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)