बीड जिल्ह्यात आज 20 पॉझिटिव्ह:राज्यात 2446 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 10 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1667 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 20 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1647 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 4 बीड 2 केज 1 माजलगाव 4 पाटोदा 1 शिरूर 1 वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात 2 हजार 446 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. काल राज्यात 2 हजार 446 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 486 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
राज्यात आतापर्यंत 63 लाख 99 हजार 464 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे.
दरम्यान, राज्यात आज 44 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. हिंगोली, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, या पाच जिल्ह्यांमध्ये आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या कोरोनाचे 33 हजार 6 सक्रीय रुग्ण आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)