बीड जिल्ह्यात आज 34 पॉझिटिव्ह:राज्यात 2620 तर देशात 19740 रुग्णांची
बीड जिल्ह्यात आज दि 9 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1903 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 34 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1869 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 6 आष्टी 11 बीड 3 धारूर 3 गेवराई 4 माजलगाव 3 परळी 1 पाटोदा 3 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात 2620 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात शुक्रवारी दोन हजार 620 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन हजार 943 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 97 हजार 018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. दरम्यान, राज्यात काल 59 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 33 हजार 11 सक्रिय रुग्ण आहेत.
देशात कोरोना संक्रमितांची संख्या 19,740
देशवासीयांसाठी मोठी खुशखबर आहे. देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटत आहे.
पाठिमागील 24 तासात संपूर्ण देशात नोंदली गलेली कोरोना संक्रमितांची संख्या 19,740 इतकी आहे. संपूर्ण देशात प्रदीर्घ काळानंतर प्रथमच रुग्णसंख्या 20 हजारांच्या खाली गेली आहे. पाठिमागील 206 दिवसांमधील हा सर्वात निचांकी आकडा आहे. देशातील आजवरची कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 3 कोटी 39 लाख 309 ईतकी झाली आहे. पाठिमागील 24 तासात 248 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4, 35, 375 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
देशातील एकूण सक्रिय कोरोना संक्रमितांच्या संख्या 2,36,643 इतकी आहे
देशातील कोरोना संक्रमितांचे बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.98% इतके आहे. मार्च 2020 नंतर हे प्रमाण प्रथमच सर्वात कमी आढळून आले आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)